spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिवघेन्या वाकी डोहाच्या कुंपणाकरिता ४६ लक्ष निधी तत्काळ मंजूर

– सावनेर विधानसभा क्षेत्राचे कामगिरी दमदार आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या धडक प्रयत्नातून मिळाला तत्काळ निधी

– हितज्योती आधार फाऊंडेशन ने केली होती मागणी.

खापा, वार्ताहर :- सावनेर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ताजुद्दीन बाबा वाकी दरगाह जवळून वाहत असलेल्या कन्हान नदिच्या डोहात पर्याप्त सुरक्षा आणि सुविधा नसल्याने दरवर्षी बुडून अनेकांचा नाहक मु्त्यू होत होता. सदर अप्रीय घटना टाळण्यासाठी हितज्योती आधार फाऊंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, समाजसेवक भुषण कुबडे, मदन डहाके, निखिल पोटभरे आदिंनी सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख यांच्याशी व्यक्तिशः त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सदर विषयावर विस्तृत चर्चा करुण तातडीने उपाययोजना करणाकरिता लेखी निवेदन दिले होते.

सदर निवेदनावर लगेच साकारात्मक विचार करुण आमदार डॉ. आशिष देशमुख, तहसीलदार सावनेर, उपविभागीय अधिकारी सावनेर विभाग, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग सावनेर तसेच नागपुर यांच्याशी वेळीच संपर्क साधून घटनास्थळ पंचनामा व तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांची माहिती संकलित करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने सावनेर तहसीलदार, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी दोनदा घटनास्थळी भेट देऊन सदर ठिकाणी प्रथम चरणी काटेरी तारांचे कुंपन, बँरीकेटींग, धोक्याचे स्थळ, जिवघेणा डोह आदीचे फलक, सुरक्षा कँमेरे लावने व सुरक्षा रक्षक नेमुन कन्हान नदिच्या सदर डोहाकडे जाणाऱ्यांना रोखण्याकरीता कडेकोट बंदोबस्त करणे, आवश्यक असल्याची माहिती क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांना देण्यात आली असता त्यांनी वरिल उपाययोजना करण्यासाठी लागणार्या निधीचा आराखडा तातडीने तयार करण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने पाटबंधारे प्रकल्प विभाग नागपुर द्वारे ४६ लक्ष ४० हजार रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करुण जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर केला असता आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी वेळोवेळी संवाद साधुन कन्हान नदीच्या सदर वाकी डोहात सातत्याने होत असलेल्या जिवीतहानी थांबवीने अंत्यंत गरजेचे असल्याचे निदर्शनास आनुन देत दि. २९ मे रोजी पार पडलेल्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सभा (सन २०२६-२७) नाविन्यपूर्ण (लेखाशीर्ष) अंतर्गत सदर कार्यांस मान्यता प्रदान करुण ४६ लक्ष ४० हजार रुपयाचा निधी मंजूर करुण त्यातील पहिला टप्पा २० लक्ष रुपये वितरित करण्यात आले.

“आमदार आशिष देशमुख यांच्या प्रयत्नाला यश”

सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांना हितज्योती आधार फाऊंडेशनचे हितेश बनसोड, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, समाजसेवी भुषण कुबडे यांच्या नेतृत्वाखाली २ मे २०२६ रोजी निवेदन सादर करुण सदर जिवघेणा डोह बुजवण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार डॉ आशिषबाबू यांनी वेळीच दखल घेत पाटबंधारे विभाग सावनेर यांना घटनास्थळी पोहचुन वस्तुस्थितीची जाणीव करण्याच्या सुचना दील्या असता पाटबंधारे विभागाचे उपअभियंता व त्यांच्या सहकार्यांनी त्याच दिवशी घटनास्थळी भेट दीली व आमदार यांच्या सोबतच आपल्या वरिष्ठांना ही सदर माहीती प्रदान केली असता दि. ५ मे २०२६ रोजी सावनेर तहसील चे तहसीलदार अक्षय पोयाम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर दमहे यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सोबत घेत सदर डोहाची पाहणी व उपाययोजना करूण लगेच आराखडा तयार करुण शासन दरबारी मंजुरी करीता पाठवला. अवघ्या एक आठवड्यात सर्व कागदोपत्री कारवाई व मात्र तीन आठवड्यात सदर प्रकल्पाला मंजुरी मिळवून देत सदर ठिकाणी पोहण्याच्या निदात अश्या प्रकारे होत असलेल्या मु्त्यूची मालीका रोखण्यासाठी टोकाचे प्रयत्न करणारा एक खरा जनतेचा सेवक म्हणून डॉ. आशिष देशमुख यांचे कौतुक होत आहे. आज जरी सरद परिसरात काटेरी कुंपण, बँरीकेटींग व इतर उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही भविष्यात सदर जिवघेणा डोह पुर्णपणे बुझवीन्याकरिता ही आमदार देशमुख पुर्ण प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.