spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ४७ प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर, ता. ७ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार(ता.०६)  रोजी शोध पथकाने ४७ प्रकरणांची नोंद करून ३९,९००/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड)  या अंतर्गत २७ प्रकरणांची नोंद करून १०,८००/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून २००/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून २,४००/- रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०८ प्रकरणांची नोंद करून ११,५००/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणाची नोंद  करून रू.२,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास २० प्रकरणांची नोंद करून ४,०००/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०९ प्रकरणांची नोंद करून रु.९,००० /- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. मंगलम हायइटस यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.१०,०००/- चे दंड वसूल करण्यात आले.तसेच मे.महालक्ष्मी कंस्ट्रक्शन्स यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू.5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मे.अण्णा इडली यांनी चेंबर मध्ये अन्न टाकल्यामुळे रू.20,००० /- दंड वसूल करण्यात आले.धरमपेठ झोन अंतर्गत मे. झाडे स्वीट मार्ट यांनी डिसेलटिंग चेम्बर नसल्यामुळे रू.५,०००/-दंड वसूल करण्यात आले.मे.रेणुका इन्फ्रा यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.१०,०००/- चे दंड वसूल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे.फास्ट ट्रॅक,मे.उर्जा अबॅकस टीचर ट्रेनिंग व मे.कुमुदिनी आय हॉस्पिटल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने  प्रत्येकी रू. ५,०००/- या प्रमाणे रू.१५ ,०००/- चे दंड वसूल करण्यात आले.तसेच शशांक समुंद्रे यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू.5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.धंतोली झोन अंतर्गत मे. मौर्य अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.१०,०००/- रूपयांची वसुली करण्यात आली. गांधीबाग झोन अंतर्गत मे. पवन  किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल  रू.५,०००/-चे दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने ११ प्रकरणांची नोंद करून रू. ८५,०००/- दंड वसूल केला.

Popular Articles