सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 51 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

0
38

नागपूर, ता. ४ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार(ता.3)  रोजी शोध पथकाने 51 प्रकरणांची नोंद करून 22,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 8,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 800/- रूपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1  प्रकरणाची नोंद  करून रू.1,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 17 प्रकरणांची नोंद करून 3,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून रु.3,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने नेहरूनगर झोन अंतर्गत लोकल स्वीट भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.५,०००/-चे दंड वसूल करण्यात आले.गांधीबाग झोन अंतर्गत मे. रूकमिणी स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.५,०००/-चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.साईनाथ स्वीटस यांनी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.५,०००/-चे दंड वसूल करण्यात आले.  आशीनगर  झोन अंतर्गत सुधीर टेंभूर्णे यांनी बांधकामामुळे जवळचे चेंबर तोडल्यामुळे रू.5,000/- चे दंड वसूल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने  4 प्रकरणांची नोंद करून रू.20,000/- दंड वसूल केला.