spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वरूड तालुक्यासह मोर्शी तालुक्यातील ६ महसूल मंडळ शासनाच्या नुकसान भरपाई मदतीपासून वंचित ! 

– वरूड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत जाहीर करा ! 

– देवेंद्र भुयार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी ! 

मोर्शी :- मोर्शी विधानसभा मतदार संघ हा विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून मागील काही वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटांमुळे मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने अतिवृष्टी मदतीचा शासन निर्णय जाहीर केला असून त्यामध्ये संपूर्ण वरूड तालुका वगळण्यात आला आहे. तसेच मोर्शी तालुक्यात ७ महसूल मंडळाचा समावेश असून मोर्शी तालुक्यातून रिद्धपूर मंडळाचेच पंचनामे शासनाकडे सादर झाल्यामुळे शासनाने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या अतिवृष्टी च्या पॅकेज मधून मोर्शी तालुक्यातील फक्त रिद्धपूर मंडळालाच मदत मिळणार असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे मोर्शी ६ महसूल मंडळ मदतीपासून वंचित राहणार आहे. वरुड मोर्शी तालुक्यातील संत्रा, मोसंबी, कपाशी, तूर, सोयाबीन, मिरची, पिकाचे ३३% पेक्षा नुकसान झाल्यामुळे वरूड मोर्शी तालुक्यातील ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३२ हजार ५०० रुपये प्रमाणे १६३ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत विशेष बाब म्हणून जाहीर करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

वरूड तालुक्यासह मोर्शी तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनसुद्धा मोर्शी तालुक्यातील ६ महसूल मंडळांचा समावेश नसल्यामुळे हिवरखेड, अंबाडा, शिरखेड, धामणगाव, मोर्शी, नेरपिंगळाई या संपूर्ण महसूल मंडळातील पंचनामे न झाल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदतीपासून वंचित रहावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका हा मोर्शी वरूड तालुक्यातील ५० हजार हेक्टर क्षेत्रांतील संत्रा, मोसंबी, कपाशी तूर सोयाबीन मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कोट्यावधी रुपयांच्या मदतीपासून संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना वंचित रहावे लागणार असल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे अतोनात नुकसान झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिसला देण्यासाठी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वरूड मोर्शी तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या लाखो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून विशेष बाब म्हणून तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार का? याकडे मोर्शी वरूड तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.