Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 72 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 72 प्रकरणांची नोंद

0
58

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.24) रोजी शोध पथकाने 72 प्रकरणांची नोंद करून 39,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300/- रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 11,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/ रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे व साठवणे टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 7,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 23 प्रकरणांची नोंद करून 4,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 05 प्रकरणांची नोंद करून 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

वायू प्रदुषणासंदर्भात रू.25,000/-दंड

तसेच उपद्रव शोध पथकाने आशीनगर झोन अंतर्गत मे.सुपर केमिकल सप्लायर यांनी कारखान्यातील धुराने आजुबाजूचा परिसर प्रदूषित झाल्याने रू.25,000/-दंड वसुल करण्यात आला.लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.न्यु अर्थ इंफ्रा यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले.तसेच विकास नेरकर यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.धरमपेठ झोन अंतर्गत मे.अदिती हाईटस यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले.मे.मधुबन एक्झिबिशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी असे एकुण रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. हरीओम भोजनालय यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधी बाग झोन अंतर्गत जय माता दी किराणा शॉप यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.एल.के.फुड प्रॉडक्टस यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत मोईन शेख यांनी रस्त्यालगत लॅबचा सामान्य कचरा टाकल्यामुळे रू.5,000/-चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू. 75,000/- दंड वसूल केला.