नागपूर :- उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एजुकेशन कोराडी रोड पांजरा येथे राष्ट्रीय सन म्हणून ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार दिलीप येवले ह्याच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींनी देशभक्तीवर आधारित गाणे व दमदार भाषणाद्वारे कार्यक्रमाची सुरुवात केली. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. दुर्गेश वासनिक ह्यांनी प्रजासत्ताक दिनाचा महत्व विद्यार्थिनींना समजावून दिले व संविधानामुळे आपल्या भारतामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीतपणे व्यवस्थापित झालेल्या आहेत असे संबोधन दिले. प्रजासत्ताक दिनानिमित्य अनुजा वाघमारे, स्मिता आत्राम, काजल वाघमारे, आरती मज्जी व बी एस सी भाग – २ मधील विद्यार्थिनींनी राष्ट्रभक्तीपर सामूहिक गायन केले व विद्यार्थिनींनी मध्ये जोश उत्साह वाढला. दिलीप येवले ह्याच्या हस्ते स्पर्धेत जिंकून आलेल्या विद्यार्थिनींना पारितोषिके देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार सलोनी हेमके, अपर्णा राऊत हिने केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील संचालिका वैशाली फुले, प्राचार्य डॉ. दुर्गेश वासनिक, प्रा.अश्विन अंजीकर, प्रा. प्रीती मानकर, प्रा. प्राची रंगारी, प्रा.मोनाली रामधाम, प्रा. आफरीन सिद्दीकी, प्रा. पूनम सोनवने, प्रा. मोहिता जैतवार, प्रा.नेहा तेलमोरे, प्रा. साक्षी जैस, प्रा. मृण्मयी जोगळेकर, प्रा. शिल्पा कावळे, प्रा. प्रियांका ढोके, पवन करमेले, निलेश मेश्राम, गौरव गावंडे, समीक्षा खोब्रागडे, साक्षी जगताप, प्राची टेम्भरे, कीर्ती भोस्कर, मधुकर डांगे प्रामुख्याने उपस्थित होते.








