कन्हान १८ : – परिसरातील शाळा, महाविद्यालय, शासकिय कार्यालय, राजकिय, सामाजिक व सेवा भावी संस्थे व्दारे विविध कार्यक्रमासह झेंडावंदन करून ७९ वा स्वातंत्र दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण कन्हान
शनिवार (दि.१५) ऑगस्ट २०२५ ला ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण कन्हान व्दारे स्वामी विवेकानंद नगरयेथे सकाळी ९.३० वाजता संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या अध्यक्षेत माजी नगरसे विका राखी परते यांचे हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे, माजी नगरसेविका गुंफा तिडके यांचे हस्ते महात्मा गांधी, पोतदार सर यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडक र यांच्या प्रतिमेचे, एकनाथ खर्चे सर यांचे हस्ते ध्वज पुजन करून जेष्ट महिला बीरे काकु यांचे हस्त ध्वजा रोहन करून तिरंगा झेंडयाला सलामी देऊन देशाला स्वातंत्र प्राप्ती करिता बलीदान देणा-या सर्व महामान वाना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्या त आली. यावेळी डॉ. जामोदकर, डॉ. जुनघरे, डॉ. काठोके, नरेंद्र वाघमारे, किशोरी अरोरा, ताराचंद निंबा ळकर, मधुकर नागपुरे, बाला नायर, विठ्ठल मानकर, नामदेव नवघरे, शालीकराम ठाकरे, विजय डोणेकर, अशोक पोटभरे, कोठीराम चकोले, शांताराम जळते, प्रविण सातदेवे, चंद्रशेखर कळमदार, नेवालाल पात्रे, ज्ञानेश्वर दारोडे आदी सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत सैनिक रवि राघव रंग, माजी मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव सर, पी.पी. पोतदार सर, लताताई वंजारी, राखी परते हयानी स्वातंत्र प्राप्ती च्या इतिहासावर सुंदर मार्गदर्शन केले. देशाला स्वातंत्र प्राप्तीच्या ७८ वर्षा नंतर ही उपासमारी, बेरोजगारी, महागाई, महिलावर होणारे अत्याचार, जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी यांच्या शेतमालास हमीभाव मिळत नसल्याने कर्जबाजारी होत आत्महत्या करित आहे. अश्या विविध समस्या सुटत नसल्याची खंत व्यकत करून आपण प्रत्येकांनी भारतीय नागरिक म्हणुन आपल्या कर्तव्याचे योग्य पालन करून कार्य केल्यास याही गंभीर समस्येचे निराकरण होऊ शकते. करिता आपण सर्वानी भारताचे कर्तव्यनिष्ठ, जागरूक नाग रिक म्हणुन कार्य करणे ही काळाची गरज आहे. असे अध्यक्षिय मार्गदर्शनात मा. प्रकाश भाऊ जाधव हयानी संबोधित करून सर्वाना ७९ व्या स्वातंत्र दिनाच्या शुभे च्छा दिल्या. सर्वाना अल्पेहार व चाय वितरण करून स्वातंत्र दिन कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलेश पांजरे हयानी तर सुत्रसंचालन रविंद्र चकोले यानी केले. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे , सचिन साळवी, अशोक हिंगणकर, रूपेश सातपुते, हबीब शेख, पुरूषोत्तम येणेकर, संतोष गिरी, गोविंद जुनघरे, प्रशात येलकर, प्रतिक जाधव, प्रविण गोडे, जीवन ठवकर, राजेश गणोरकर, मनोज गुडधे, अशोक मेश्राम, निशांत जाधव, यशवंत खंगार, दामोधर बोक डे, क्रिष्णा केझरकर, तेजस रोडेकर, संजय वानखेडे आदीनी सहकार्य केले.
श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान
श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी (दि.१३) ऑगस्ट पासुन रोज सकाळी शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. स्वातं त्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, तिरंगा रॅली इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. शुक्रवार (दि.१५) ऑगस्ट ला प्रमुख पाहुणे शाळेचे संस्थाचालक नरेंद्रजी वाघमारे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणुन माजी मु.अ आयशा अन्सारी , माजी स. शिक्षिका मंदाकिनी रंगारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्र माचे सुत्रसंचालन नेहा गायधने मॅडम तसेच प्रस्ताविका शाळेचे मुख्याध्यापक हेमंत वंजारी सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पवन ठमके सर यांनी केले. कार्यक्रमा स गीता वंजारी , भास्कर सातपुते , अभिषेक मोहनकर , कीर्ती वैरागडे , जयश्री पवार योगिता चांदेवार आणि वस्तीगृहाचे अधिक्षक गणेश रामापुरे सर आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नगरपंचायत कांद्री (कन्हान )
नगर पंचायत कांद्री येथे १५ ऑगष्ट ला ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. नगर पंचायत चे मुख्याधिकारी सचिन गाढवे यांचा हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य दिन, हा देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. १९४७ मध्ये याच दिवशी भारताला ब्रिटि शांच्या राजवटीतुन स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस भारता च्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस असुन जो भारतीयांना त्यांच्या बलिदानाची आणि त्यागाची आठ वण करून देतो. नगरपंचायत मधिल सर्व अधिकारी व कर्मचारी आणि शहरातील ज्येष्ठ नागरिक, माजी ग्राम पंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका व सर्व विद्यार्थी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत स्वतंत्र दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
यशवंत विद्यालय वराडा
शुक्रवार (दि.१५) ऑगस्ट २०२५ ला यशवंत विद्यालय वराडा येथे सकाळी ९ वाजता शाळेच्या मुख्याध्यापिका के. बी.निंबाळकर यांचे अध्यक्षेत ग्रा प वराडा चे सरपंच मा.सुनिल जामदार यांचे हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले. तदंतर विद्यार्थ्यानी संगितावर कवायत, डमलेश कवायत शिस्तित सादर केली. या प्रसंगी पोलीस पाटील संजय नेवारे, मारोती नागमोते, पारधी, सुभाष देऊळकर, विपला फॉऊडेशनचे निखि ल किनेकर, सुरज थुल आदी प्रामुख्याने उपस्थित होते . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत (दि.१३)ऑगस्ट पासुन रोज सकाळी शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, तिरंगा रॅली इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. तीन दिवस विविध कार्यक्रमाने स्वातंत्र दिन उत्साहने साजरा करण्यात आला. सुत्रसंचालन राकेश गणविर सर यानी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश कुथे सर हयानी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता राजेंद्र गभणे सर, अर्चना शिंगणे मँडम, कु. पायल कोटरूंघे मँडम, मोतीराम रहाटे, दिपक पांडे सह विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.
सर्वधर्म समभाव संघटन कन्हान
सर्वधर्म समभाव संघटन कन्हान द्वारे स्वातंत्र्य दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक कन्हान येथे करण्यात आले. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित कन्हान पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, शहिद भगतसिंह यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी स्वातंत्र्य दिवसावर उपस्थितां ना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी केतन भिवगड़े, नितिन मेश्राम, सचिन यादव, हरिभाऊ वान खेडे, मुकेश बागडे, विनोद मसार, दिलीप लिंबोने, दिलीप गजभिये, विद्यानंद सहारे, कमलेश नंदेश्वर सह नागरिक उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान
नगर सुधार समिती कन्हान द्वारा संचालित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय रेल्वे स्टेशन रोड कन्हान येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. छाया नाईक अध्यक्षा नगर सुधार समिती आणि पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाची इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. त्रिशा वसंत पेंदाम यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्या पक आर.आर.लाखपाले, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा चार्य एस. आर बनकर आणि इतर मान्यवरांनी स्वातं त्र्य दिवसावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे व कनिष्ट महा विद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत, भाषणे, नाटक व नृत्य सादर केली. स्व.श्री माणिकराव वाघधरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. गरजु विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित मान्यवरा कडुन गणवेश वितरित करून त्यांचे मनोबल वाढवुन स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वंदना दिपक गजभे यांनी तर आभार प्रदर्शन सौ.रंजना माहुरकर हयांनी केले. याप्रसंगी नगर सुधार समितीचे पदाधिकारी दिनकरराव मस्के, वासुदेवराव चिकटे, प्रकाश नाईक, मिलिंद वाघदरे, पुरुषोत्तम कुंभलकर, केतन भिवगडे, रमेश चित्रीव, वसंतराव इंगोले, बिरेंद्र सिंह, रिंकेश चवरे, राजेंद्र शेंदरे, कैलाश खंडार, आशिष दिवटे, अलका कोल्हे, प्रियंका वाघधरे, माया कांबळे, सुनिता येरपुडे, सुनंदा दिवटे, मुन्नी चव्हाण, प्रतिक्षा चवरे यांच्या सह विद्यालयाचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.




