spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 81 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरूवार(ता.18) रोजी शोध पथकाने 81 प्रकरणांची नोंद करून 42,000/- रुपयांचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200/- रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 800/- रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/-रुपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 11,500/- रुपयांची वसुली करण्यात आली.वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.2,500/- चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 30 प्रकरणांची नोंद करून 6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 11 प्रकरणांची नोंद करून रु.11,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.अन्जनेय क्रेस्ट यांनी जुनी इमारत पाडण्या कामा दरम्यान सुरक्षितेची काळजी न घेतल्यामुळे रू. ५,००० दंड वसूल करण्यात आले.तसेच रिशिकेष डोंगरे यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत रू.5,000/- दंड वसुल करण्यात आले.धरमपेठ झोन अंतर्गत मे.सिध्दीविनायक इन्फ्रास्ट्रक्चर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000 दंड वसूली करण्यात आली. हनुमाननगर झोनअंतर्गत अभिजीत गुप्ता यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत रू.5,000/- दंड वसुल करण्यात आले.धंतोली झोन अंतर्गत यांनी मे. शिवशक्ती कॅटरर्स यांनी जवळच्या नाल्यात अन्न टाकल्यामुळे रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले.गांधीबाग झोन अंतर्गत मे. जैन बिल्डर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/-दंड वसुल करण्यात आले.सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.योगेश किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. बॉम्बे हाईटस बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000 दंड वसूली करण्यात आली.उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.55,000/- दंड वसूल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.