spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 83 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरूवार(ता.25) शोध पथकाने 83 प्रकरणांची नोंद करून 41,700 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 31 प्रकरणांची नोंद करून 12,400 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1,200 रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 10,500 रुपयांची वसुली करण्यात आली.वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवासायिकाने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.1,000 वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणेया अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून रू.3,000 दंड वसुल करण्यात आले.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 28 प्रकरणांची नोंद करून 5,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून रु.8,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत सुनील बालानी यांनी विनापरवानगीने रस्त्यावर खड्डा केल्यामुळे पाईपलाईन तुटल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.धरमपेठ झोन अंतर्गत मे.द फॅशन कासा एक्झिबिशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू. ५,००० चे दंड वसूल करण्यात आले. मे. रोकडे ज्वेलर्स यांनी रस्त्यावर चिखल आणि माती टाकल्यामुळे रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले.हनुमाननगर झोन अंतर्गत मे.श्री निर्मल ज्वेलर्स यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू. ५,००० चे दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.पुजा स्वीट भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.गोपाल कंस्ट्रक्शन यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले.आशीनगर झोन अंतर्गत मे.श्री स्वस्तिक रेस्टॉरेंट यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू. ५,००० चे दंड वसूल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू.40,000 दंड वसूल केला.

Popular Articles