– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरूवार(ता.6) शोध पथकाने 84 प्रकरणांची नोंद करून 36,900 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 6,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200/- रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400 रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 11,500 रुपयांची वसुली करण्यात आली.वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.1,000 रूपयाची वसुली करण्यात आली.सार्वजनिक रस्ता,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणेया अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.1,000 दंड वसुल करण्यात आले.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 39 प्रकरणांची नोंद करून 7,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून रु.7,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. ड्रीम्स कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.उमेश ट्रेडींग स्वीटस आणि मे.नंदा स्वीटस अँड नमकीन यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.कीर्ती अगरबत्ती यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.पॉलीक्लिनीक हॉस्पीटल यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू.35,000 दंड वसूल केला.




