spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ८६ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ७९ मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. शुक्रवार (ता.३०) शोध पथकाने ८६ प्रकरणांची नोंद करून ४०८०० रुपयाचा दंड वसूल केला.

हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. ४०० दंड) या अंतर्गत ५२ प्रकरणांची नोंद करून २०८०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. १०० दंड) या अंतर्गत २ प्रकरणाची नोंद करून २०० रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. ४०० दंड) या अंतर्गत ७ प्रकरणाची नोंद करून २८०० रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिने माहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत २२ प्रकरणांची नोंद करून १३००० रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत २ प्रकरणाची नोंद करून २००० रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १८ प्रकरणांची नोंद करून ३६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. जय भोले सावजी यांच्यावर रस्त्यालगत अस्वच्छता पसरविल्या प्रकरणी रु.५,००० चे दंड वसुल करण्यात आले. मे. सदा वात्सल्य यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी रु.१०,००० चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.जसबीर रेस्टोरंट यांच्यावर रस्त्यालगत अस्वच्छता पसरविल्या प्रकरणी रु.५,००० चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. ज्योती स्वीट भंडार आणि मे. सरिता स्वीट भंडार यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. ५,००० असे एकूण १०,००० दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. रूप स्वीट यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.५००० चा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत मे. टॅलेंट हब यांच्यावर विद्युत खांबावर अनधिकृतरित्या फलक लावल्याप्रकरणी रू. ५००० दंड वसूल करण्यात आला. तसेच मंगळवारी झोन अंतगर्त मे.न्यू एरा बिल्डर्स आणि मे.राजकुमार बिल्डर्स यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल प्रत्येकी रू.१०००० असे एकूण रू. २०००० चा दंड वसूल करण्यात आला. तर मे. अधिकारी रेस्टोरंट आणि मे.हॉटेल दुआ यांच्या रस्त्यालगतच्या परिसरात अस्वच्छता पसरविल्याबद्दल प्रत्येकी रू. ५००० असे एकूण रू. १०००० चा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने ११ प्रकरणांची नोंद करून रू. ७०,००० दंड वसुल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.