spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महात्मा फुले शिक्षण संस्थेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

– महापुरुषांच्या विचारांना अभिवादन; मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांना माल्यार्पण

नागपूर :- महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूरद्वारे संचालित थोर महापुरुषांची जयंती व स्मृतिदिन समारोह समितीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गुलाबराव चीचाटे व सरचिटणीस रवींद्र अंबाडकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे प्रकाश देवते, रमेश राऊत, प्रा.मुकेश घोळसे, संचालक तथा थोर महापुरुषांची जयंती व पुण्यस्मरण समारोह समितीचे संयोजक राजेंद्र पाटील, सहसंयोजक तथा संचालक प्रा. डॉ. अभिजीत पोतले, संचालक सुनील चिमोटे, शरद चांदोरे आणि देवेंद्र काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय अशोकराव अंजनकर, प्रा. प्रदीप दहिकर, शंकरराव चौधरी, आनंदराव बानाईत, प्रभाकरराव येवले, सिंधू कांडलकर, रंजना कडुकर, गंगाधरराव कडुकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारीवृंद आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिना निमित्त आयोजित अशा कार्यक्रमांमधून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आणि समाजात शिक्षण, समता, बंधुभाव व राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देवते, सहचिटणीस रमेश राऊत, प्रा. मुकेश घोळसे, संचालक तथा समारोह समितीचे संयोजक राजेंद्र पाटील, सहसंयोजक प्रा. डॉ. अभिजीत पोतले, संचालक सुनील चिमोटे, शरद चांदोरे, देवेंद्र काटे यांच्यासह अशोकराव अंजनकर, प्रा. प्रदीप दहिकर, शंकरराव चौधरी, आनंदराव बानाईत, प्रभाकरराव येवले, सिंधू कांडलकर, रंजना कडुकर, गंगाधरराव कडुकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला समाजबांधव आणि संस्थेच्या कर्मचारी वृंदाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.

Popular Articles