Home Latest News राज्यपालांच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन 

राज्यपालांच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन 

0
52
 
मुंबई १ : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी बसवलेल्या पाच दिवसांच्या गणरायाचे रविवारी (दि. ३१) राजभवन येथे फुलांनी सजवलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच  राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला.

राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली गणेशाची मूर्ती शाडूची होती व ही मूर्ती नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती.   
विसर्जनाचे वेळी  राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, इस्कॉनचे गौरांग दास, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती  तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.