किशोर साहू :मौदा, १: तालुक्यातील गट ग्रामपंचायत भेंडाळा येथे शनिवार (दि. 30 ऑगस्ट) ला आमसभा घेण्यात आली . सर्व विषयांवर चर्चा करून विविध विकासात्मक चर्चा करून विविध ठराव घेण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती स्थापन करण्यासाठी लोकशाही पद्धतीने प्रक्रिया पार पाडून त्यामध्ये गावातील सामाजिक कार्यकर्ते कवडू वाडीभस्मे यांची निवड करण्यात आली. सोबतच उपाध्यक्षपदी गावातीलच सामाजिक कार्यकर्ते बब्बू उर्फ श्रीनाथ अटलुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी 2 वर्ष गावातील तंटे सोडविण्यात मोलाचे सहकार्य करणारे ,सर्वांना समान न्याय देणारे माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव वाघाडे यांना शाल, श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला .सोबतच नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या शाल, श्रीफळ देऊन सरपंचा शिल्पा राजकुमार भोयर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना गाव सुजलाम, सुफलाम, तंटामुक्त ठेवण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंचा शिल्पा राजकुमार भोयर,उपसरपंच सुष्मा धांडे, ग्रामपंचायत सदस्य गौरीशंकर कारेमोरे, पोमू मानापुरे,सुनीता नगरारे,आकाश शंभरकर, राजकुमार भोयर,सचिव ऋचा जगझापे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .




