कचऱ्यापासून करण्यात आली गणपती सजावट

0
51

खापा, ३ : नगर परिषद खापा नागरिकांमध्ये जनजागृती करिता नेहमी दैनंदिन गोळा होणारा कचऱ्यापासून नवनविन उपक्रम राबवत असते. एक महिना अगोदर खराब टायर पासून “विजयंता टँक” बनविण्यात आली. ती शहराकरीता एक सेल्फी पॉइंट म्हणून ठरली. तर या वेळेला शाडू मातीच्या वापर करून श्री गणपती बाप्पाची मूर्ती बनविण्यात आली. सजावटीसाठी कचऱ्यामधून मिळालेली झाडांचा पानाची पत्राळी, डोणे, गौराई विसर्जन निर्माल्य पासून मिळालेली नारळाचा बाहेरील भाग, खराब डीवीडी, सीडी इत्यादी साहित्यांचा वापर करण्यात आला. तसेच मूर्तीचा आजूबाजूला पर्यावरण संदेश, कचरा संकलन संदेश फलक लावण्यात आले. या केलेल्या उपक्रमाचा उद्देश शहरात पर्यावरण, माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण बाबत जनजागृती करणे हा असून याबाबत शहरात नागरिकांद्वारे नगर परिषदचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा उपक्रम नगर परिषद खापाचे प्रशासक तथा मुख्याधिकारी धनंजय सरनाईक यांचा मार्गदर्शनात करण्यात आला. तसेच प्रशासकीय अधिकारी वैभव गोळे, जयंत वानखेडे, शहर समन्वयक राहुल बावनकुळे, मनोज बडवाईक, गोदरेज फीडबॅक फाउंडेशन मॅनेजर जितेंद्र पासवान, प्रदीप रेवतकर, सुजल धनोरे यांच्याद्वारे प्रामुख्याने उत्कृष्ट सजावट करण्यात आली.