सचिन चौरसिया रामटेक ९ : कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स), रामटेक येथील त्रिवेणी वसतिगृहात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेश चतुर्थीचा उत्सव श्रद्धा, उत्साह, भजन व सांस्कृतिक वातावरणात, पारंपरिक वेशभूषेत, विद्यार्थी व कर्मचारी यांच्या सहभागाने साजरा करण्यात आला. वसतिगृह परिसर फुलांनी, रोषणाईने व रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. कर्मचारी व विद्यार्थी नियमितपणे या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत होते. यामुळे संस्थेत परस्पर सन्मान व एकजुटीची भावना प्रकर्षाने जाणवली. अकरा दिवस प्रसादाचे वितरण करण्यात आले.( दि.६) सप्टेंबरला गणपती बाप्पांना महाप्रसाद देऊन उत्साहात निरोप देण्यात आला.संस्थेचे सचिव व्ही. श्रीनिवास राव व प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती समन्वयक बी. वेंकन्ना, समिती अध्यक्ष कुसुमाकर बर्डे, विद्यार्थी डीन, वसतिगृह डीन, प्रकल्प अधिकारी, सर्व वार्डन, कर्मचारी व विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले




