मुंबई ०३ : भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. बावनकुळे यांनी यावेळी चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, राजेश पांडे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी याप्रसंगी उपस्थित होते.




