नागपूर, ०३ : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या
(सारथी) नागपूर विभागीय कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंती
निमित्त 29 जून 2025 ला रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच दीप प्रज्वलित
करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक उपव्यवस्थापकीय संचालक सुरेश बगळे यांनी केले.
रक्तदान शिबीरास महसूल विभागातील व वनामती परिसरातील अधिकारी कर्मचारी सहभागी
झाले.





