spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अमृत महाराजांचा २२ वा पुण्यतिथी महोत्सव नरखेडमध्ये सुरू

– श्री महाजन विठ्ठल-रखुमाई देवस्थानात भक्तिमय वातावरण; विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नरखेड, प्रतिनिधी :- ब्रह्मलीन गुरुवर्य परमपूज्य हरिभक्त परायण अमृत महाराज काहाले नरखेडकर यांच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री महाजन विठ्ठल-रखुमाई देवस्थान येथे पुण्यतिथी महोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.

शांतीब्रह्म परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त परायण मारुती महाराज कुरेकर, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त परायण गाथामूर्ती रामचंद्र महाराज भोदे बाबा तसेच वैकुंठमूर्ती गुरुवर्य मृदंगाचार्य पांडुरंग महाराज वैद्य यांच्या कृपाशीर्वादाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाचा शुभारंभ बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० वाजता कलशस्थापनेने करण्यात आला. हरिभक्त परायण महादेवराव नढे यांच्या हस्ते कलशस्थापना करण्यात आली. यावेळी नरखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मंगला मोकाशे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महोत्सवादरम्यान दररोज विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकडा व महापूजा, दुपारी संगीतमय श्रीमद्भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ, तर रात्री हरिकीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांमुळे भाविकांना आध्यात्मिक व भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.

श्री महाजन विठ्ठल-रखुमाई देवस्थानचे सर्व पदाधिकारी तसेच उत्सव समितीचे सदस्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. नरखेडसह परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि महोत्सवाच्या यशस्वीतेस हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.