हंसराज,भंडारा डोंगरला :- तुमसर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या डोंगरला येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया काल, २० ऑगस्ट रोजी पार पडली. या ग्रामसभेत द्वारकाप्रसाद डुलीचंद पटले यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
डोंगरला येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीचा विषय चर्चेला आला होता. यावेळी सर्वानुमते द्वारकाप्रसाद पटले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार केला.
आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना द्वारकाप्रसाद पटले यांनी डोंगरला ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाताई राहांगडाले, उपसरपंच रोशनभाऊ बोरकर, खेमराज राहांगडाले, माजी तमुस अध्यक्ष राहुलभाऊ बघेले, पोलीस पाटील शैलेश पेरे यांचे आभार मानले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य हरीश पटले, अनिल शरनांगत, अरविंद झेलकर, माया पटले, कल्पना पटले, सुषमा पटले, ज्योती मुकुरणे, सुमन सहारे यांच्यासह मंगल ठाकरे, देवदास पटले, कैलास बनकर, रेकचंद शरनांगत, मधुकर वासनिक, मोतीराम मोरे, गजानन पटले, अंबर पटले, जोगन पटले, ओमप्रकाश मेश्राम, प्रकाश शिवणकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील तंटे गावातच सुटावेत आणि गावात एकोपा राहावा, यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष पटले यांनी यावेळी व्यक्त केला.





