spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्रावणमासीय कार्यक्रमातून गृहउद्योगांना मिळाली बाजारपेठ

– विश्व हिंदू परिषद मातृशक्तीच्या तुमसर प्रखंडातर्फे उपक्रम; महिला उद्योजिकांनी हस्तनिर्मित वस्तूंसह सेंद्रिय गुळाची केली विक्री

तुमसर :- विश्व हिंदू परिषद मातृशक्ती, तुमसर प्रखंडाच्या वतीने बालाजी लॉन येथे श्रावणमासीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सावन झुल्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या गृहउद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रमही राबविण्यात आला.

गृहउद्योग करणाऱ्या महिलांनी आपल्या कला-कौशल्याचा पुरेपूर वापर करून तयार केलेल्या विविध हस्तनिर्मित वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. या छोटेखानी बाजारपेठेला महिलांकडून तसेच उपस्थित नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी ‘उडान… एक कदम आगे’च्या संस्थापक-अध्यक्षा कल्याणी भुरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संस्थांच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांचा उपयोग महिलांनी आपल्या गृहउद्योगाची बाजारपेठ मजबूत करण्यासाठी करावा. हीच आपल्या उद्योगाच्या प्रगतीची पहिली पायरी आहे, असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमात माया गौपाले यांच्या ‘तुळशी स्वयंसहायता वैंगंगा देशी गूळ’, आष्टी-नाकाडोंगरी या गृहउद्योगातील सेंद्रिय गुळाने विशेष लक्ष वेधून घेतले. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या या गुळाची उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अस्मिता सावळापुरकर, लीना निमजे, ज्योती मिश्रा, रितु पशीने, प्रीती सोनवणे यांच्यासह मातृशक्तीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.