spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोहर्ली घाटात वाघाची दहशत; एका गाईची शिकार, तर कालवड बेपत्ता

हंसराज,भंडारा तुमसर : चुलरडोह जंगलातील मोहर्ली घाटावर काल, २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास वाघाने एका गाईची शिकार केली. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, एक कालवड देखील बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दावेझरी येथील पशुपालक मूलचंद शरणागत यांची गाय जंगलात चराईसाठी गेली असताना वाघाने तिच्यावर हल्ला केला. यावेळी गुराखी धर्मराज सहारे व मोरेश्वर नेवारे यांनी प्रसंगावधान राखत तेथून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. याच घटनेत धनराज नेवारे यांची एक कालवडही बेपत्ता झाली आहे.

विशेष म्हणजे, याच परिसरात ६ ऑगस्ट रोजी एका गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा गुरांची शिकार झाल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी छ. ग. रहांगडाले यांनी चमूसह घटनास्थळी धाव घेतली असून, वाघावर पाळत ठेवली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.