spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मसकऱ्या गणपती ची धुम,विविध सामाजीक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

– 46 ठिकाणी स्थापना

– शहरात व ग्रामिण भाविविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

पारशिवनी :- पारशिवनी शहरा सह तालुक्यात ग्रामिण भागातील काही प्रमुख गावांमध्ये मस्कऱ्या गणपतीची धूम दिसून येत आहे. पारशिवनी तालुक्यात एकूण 46 ठिकाणी सार्वजनिक मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात आली असून, त्यात पारशिवनी शहरातील 15 आणि ग्रामीण भागातील 31 मस्कऱ्या गणपतींचा समावेश आहे. बहुतांश ठिकाणी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीला (दि. २८ सप्टेंबर) निरोप दिल्यानंतर संकष्ट चतुर्थीला दि. २ सेप्टेंबर ला मस्कऱ्या गणपतीची थाटात स्थापना करण्यात आली. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवात पारशिवनी शहरा सह तालुक्यातील ग्रामीण भागातील गावा मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे मस्कन्ऱ्या गणपती उत्सव मंडळांद्वारे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे. बच्चकंपनीं पासून मोठे ज्येष्ठां पर्यंतची मंडळी या कार्यक्रमांचे लाभ घेताना दिसत आहे.

पारशिवनी शहरा तील गोवारीपुरा, इंदिरा नगर बोरवन, दत्त टेकडी नागठाणा मंदिर, सोनार मोहल्ला, ढिवरपुरा शितलामाता मंदिर , प्रभाग क्रमांक१४, खारी, दिवटे नगर, खारी पारशिवनी, साई ले आऊट, गाड़गे नगर, सह तालुक्यातील ग्रामीण मध्ये तेली मोहल्ला पालोरा, हनुमान मंदिर पालोरा, महाकाल गणेश उत्सव मंडल, अष्टविनायक मंडल नया कुंड, वार्ड नं 2 नयाकुंड , बाबुलवाडा, करंभाड़, धुंडे मोहल्ला करंभाड, भक्ते करंभाड, तामसवाडी, पिपला बखारी, दहेगाव जोशी निंबा, सकरला, पारडी, पेंढरी, माहुली, मेहंदी, डुमरीकला, हेटी टोला , नवेगाव खैरी, खैरी, चारगाव, आमगाव, सुवरधरा, सुरेरा, कोलितमारा, बच्छेरा, सालई माहुली, अंबाझरी व अन्य गावां मध्ये मस्कऱ्या गणपतींची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली असून, याला पोलिस प्रशासनाने दुजोरा दिला आहे गणेश विर्सजन दिनांक १९ सप्टेबर ते २१ सप्टेबर तीन दिवस होण्याची माहिती पोलिस विभागाचे गोपानीय विभागा तर्फे मिळाली आहे..

मस्कऱ्या गणपती उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी.

कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची मंडळाच्या सदस्यां सोबत इतर प्रत्येकाने काळजी घ्यावी. लाऊड स्पीकरचा आवाज कमी असावा. आक्षेपार्ह देखावे तयार करू नये. वीज पुरवठा घेण्यासाठी महावितरण कंपनीची परवानगी घ्यावी. रोडवर मंडप टाकून नये. रहदारीस अडसर निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, आदी सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.– राजेशकुमार थोरात, ठाणेदार, पोलिस ठाणे, पारशिवनी.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी मस्कऱ्या गणपतींची स्थापना झाल्याची माहिती पारशिवनी पोलिस ठाण्यातील गोपनीय विभाग प्रमुख पृथ्वीराज चौहान यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.