कन्हान :- माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंद आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबई रोटी फाउंडेशन च्या माध्यमातुन शालेय विद्यार्थ्याना योग्य शिक्षण, साधन-सामग्री आणि योग्य पायाभुत सुविधा देण्यात येत असल्याने बळीराम दखने हायस्कुल व्दारे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंद व त्यांच्या सहका-यांचा आणि माजी विद्यार्थी तसेच माजी खासदार प्रकाश जाधव आदी मान्यवरांचा सत्कार कर ण्यात आला.
विकास प्राथमिक शाळा कन्हान व बळीरामजी दखणे हायस्कुल कन्हान येथे शालेय जीवनातील प्रत्येक मुलाला योग्य शिक्षण, साधन-सामग्री आणि योग्य पायाभुत सुविधा मिळावीत, यासाठी माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंद आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबई रोटी फाउंडेशन मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. या फाउंडेशन द्वारे शाळांना दिलेली मदत हे एका उंच आणि प्रेरणादायक कार्याचे उदाहरण आहे. अशा प्रेरणादायी माजी पोलिस महासंचालक व समाजसेवक डी. शिवानंद सर, त्यांचे सहकारी चंद्रजी बागरिया, प्राध्यापक संजय पन्नासे, संजय सरकार यांनी शाळेला भेट दिली असता




