spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अत्यावश्यक कामांसाठी महावितरणचा ‘शटडाऊन’; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

नागपूर :- नागपूर शहराला अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून नियमित देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी बुधवार, १७ सप्टेंबर रोजी शहराच्या काही भागातील वीजपुरवठा काही काळासाठी बंद राहणार आहे. महावितरणने केलेल्या या कामांमध्ये नवीन रोहित्र कार्यान्वित करणे, जुन्या वाहिन्यांची दुरुस्ती आणि उच्चदाब वाहिन्यांचे स्थलांतरण यांसारख्या अत्यावश्यक कामांचा समावेश आहे.

ग्राहकांनी या कामांमध्ये सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता त्यांना सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळू शकेल. या कामांमुळे कॉग्रेसनगर विभागात सकाळी ८ ते ११ या वेळेत निंबा, चिकना, धामणा, खरसोली, पिलकेपार, सालई, गोधनी, कालडोंगरी, नवेगाव, मानव मंदिर, गुरुकृपा नगर, धांडे लेआउट, वसंतनगर, लक्ष्मीनगर, विद्यापीठ परिसर. सकाळी ८ ते १२ या वेळेत जगन्नाथ नगर, लोकमान्य सोसायटी, जयंती नगरी-६, पद्मावती नगर, राजेश्वरी पार्क, मेश्राम लेआउट, मनोहर सोसायटी, जयराम कॉलनी, धोबी नगर, चिंतामणी २ आणि ३, शांती हाईट्स. सकाळी ८:३० ते १२:३० या वेळेत: टेलिकॉम नगर, स्वावलंबी नगर, फ्रेंड्स कॉलनी, रवींद्रनगर, गावंडे लेआउट, पायोनियर सोसायटी, स्वरूप नगर, तात्या टोपे नगर, अत्रे लेआउट, धनगरपुरा, ग्राहक सुविधा केंद्र. सकाळी ८:३० ते ११:३० या वेळेत प्रताप नगर पोलीस स्टेशन, एनआयटी लेआउट, त्रिमूर्ती नगर, प्रियदर्शनी नगर, भुजबळ लेआउट, आदर्श कॉलनी, गेडाम लेआउट, भामटी वस्ती, गुडघे लेआउट या भागातील वीज पुरवठा बंद राहील.

महाल विभागात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत: शितला माता मंदिर, बापू नगर, मिरे लेआउट, प्रशांत नगर, नंदनवन रोड, नंदनवन कॉलनी, कबीर नगर, गुरुदेव नगर, कीर्ती नगर, सर्वश्री नगर, नवनाथ आयटीआय, प्रगती कॉलनी, गौसिया, कंट्रोल तर सकाळी ९ ते दुपारी १२: मानापूर चौक, नवाबपुरा, लाकडी पूल, अयाचित मंदिर या भागातील वीज पुरवठा बंद राहील.

गांधीबाग विभागात सकाळी ८ ते ११:३० या वेळेत भवानी नगर, रेणुका नगर, गुरुदेव पानठेला, गंगाबाग, गौरी नगर आणि सकाळी ९ ते १०: होलसेल मार्केट, नंगा पुतळा आणि तहसील या भागातील वीज पुरवठा बंद राहील.

सिव्हील लाईन्स विभागात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत यशोधरा नगर, टिपू सुलतान चौक, शिवाजी चौक. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेतवांजरा औद्योगिक परिसर. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पॉवरग्रीड, रमाई नगर. सकाळी ८ ते ११ या वेळेत राज नगर, विजय नगर, दुर्गा माता चौक, रिलायन्स पेट्रोल पंप, स्टेट बँक कॉलनी, छावणी, गोवा कॉलनी, न्यू कॉलनी. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आकार नगर, स्वामी कॉलनी फेज १ आणि २, जगदीश नगर, रक्षा कॉलनी, वीरचक्र कॉलनी, प्रेरणा नगर, गंगानगर.

बुटीबोरी विभागात सकाळी ८ ते ११ या वेळेत कन्यकापुरम, धाबा परिसर आणि भिवसेनखोरी. तर, सकाळी १० वाजेपासून एमआयडीसी औद्योगिक परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.

नागरिकांसाठी आवाहन:

ग्राहकांनी वीज पुरवठा बंद होण्यापुर्वी पाण्याची टाकी भरणे, मोबाइल फोन चार्ज करणे आणि इतर महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून ठेवावी. हा तात्पुरता वीज बंद ग्राहकांच्या दीर्घकालीन फायद्यासाठी आहे, ज्यामुळे भविष्यात अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळेल. नागरिकांनी या कामात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.