स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत इंदोरा बु. कार्यक्रम संपन्न

0
54

तिरोडा :- स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या अभियान मध्ये २४ सप्टेंबर ला प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा बु. येथे मेगा कॅम्प घेण्यात आला.

या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तेजराम चव्हाण ( सभापती, पंचायत समिती तिरोडा ) उद्घाटक चत्रभुज बिसेन( जिल्हा परिषद सदस्य ,अर्जुनी ) प्रमुख पाहुणे सुनंदा पटले, (उपसभापती,पं.स.) .हुपराज जमाईवार पंचायत समिती सदस्य, चेतलाल भगत ( पंचायत समिती सदस्य,राजेश रहांगडाले (सरपंच, इंदोरा बु.) डॉ. आदित्य दुबे ( वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र इंदोरा बु. )कार्यक्रमात एकूण २४७ लाभार्थी उपस्थित राहिले. यावेळी गरोदर मतांची स्त्रीरोग तज्ञ द्वारे तपासणी, बाळांची बाल रोग तज्ञ द्वारे तपासणी, नेत्ररोग तज्ञ द्वारे लाभार्थ्यांची तपासणी, कान नाक घसा रोग तज्ञ द्वारे लाभार्थ्यांची तपासणी, दंत रोग तज्ञ द्वारे लाभार्थ्यांची तपासणी, लाभार्थ्यांची रक्ताची तपासणी

आयुष्यमान कार्ड ekyc व आभा कार्ड बनविणे,TB स्क्रीनिंग व तपासणी, पोषण आहार बाबत माहिती देण्यात आली तसेच लाभार्थ्यांकरिता एक विशेष योगा सत्र आयोजित करण्यात आला होता. स्वस्थ नारी सशक्त परिवार विषय मार्गदर्शन करून करण्यात आले.

या वेळेस सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाला मार्गदर्शन केला.

कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र येथील अधिकारी व कर्माचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.