नगरधन किल्ल्यात माँ भवानी माता भविकांचे श्रद्धास्थान

0
153

सचिन चौरसिया,रामटेक :- तालुक्यातील नगरधन येथील वाकाटककालीन किल्ल्यात माँ भवानी मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरवात झाली आहे. प्राचीन काळापासून राजे-महाराजे युद्ध किंवा पराक्रम सुरू करण्यापूर्वी देवीची पूजा करीत असे आणि आजही नगरधन किल्ल्यात या परंपरेचे पालन होत आहे. आत प्रवेश केल्यानंतर भवानी मातेची मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेते. ‘जय माँ भवानी नवरात्र उत्सव मंडळ’ नगरधन यांच्या प्रयत्नांनी हा उत्सव गत २५ वर्षापासून भव्य स्वरूपात साजरा होतो. किल्ल्याचा संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई केली जाते आणि गावातील मुख्य रस्तांवर आकर्षक विद्युल रोषणाई करण्यात येते, त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो.