मित्राशी फोनवर बोलताना कार्डिअ‍ॅक ॲरेस्टने कोसळले, 3 मिनिटात चमत्कार, 50 वर्षांच्या शिंदेंचं हृदय पुन्हा…

0
52

नाशिक : मित्राशी फोनवर बोलत असतानाच कार्डिअॅक ॲरेस्ट झाल्यामुळे एक जण क्षणार्धात कोसळला. त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले. सुदैवाने तो दवाखान्यातून बाहेर पडताना हा प्रकार घडल्यामुळे या व्यक्तीला तात्काळ ‘सीपीआर’ देण्यात आला. केवळ तीन मिनिटांच्या शास्त्रशुद्ध सामूहिक प्रयत्नांद्वारे या व्यक्तीचे हृदय पुन्हा धडूधडू लागले. रुग्णाला जीवदान मिळाल्याने नातलगांसह सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक ॲरेस्ट यात फरक असून हार्ट अटॅकमध्ये हृदयाचे पंपिंग बंद होऊन रक्तपुरवठा बंद होतो. तर कार्डिअॅक ॲरेस्टमध्ये इलेक्ट्रिकल दोषामुळे हृदय अचानक बंद पडते. अलिकडे ४० ते ४५ वर्ष वयोगटात ॲक्युट कार्डिअॅक ॲरेस्टच्या घटना घडण्याचे आणि त्यामुळे व्यक्ती दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. ५० वर्षीय प्रशांत शिंदे हे ॲसिडिटीसदृश त्रासावर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे आले होते. ईसीजी आणि रक्त चाचणीचा अहवाल साधारण होता. परंतु तपासणीत हृदयाच्या कार्यात अनियमितता आढळल्याने त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला. ही चाचणी करण्यासाठी बाहेर पडत असतानाच दवाखान्याच्या दारात कार्डिअॅक ॲरेस्ट येऊन ते कोसळले. त्यांचे हृदय बंद पडून श्वासोच्छवासही थांबला होता.

source : Maharashtra times