spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापारेषण ४०० के.व्ही.उपकेंद्र कोराडी -२ तर्फे गौरक्षण, धंतोलीत “गो-आहार दान कार्यक्रम” पार पडला

– सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत “गो-आहार दान कार्यक्रम”

नागपूर :- मानव संसाधन सांघीक कार्यालय मुंबई यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार “सेवा पंधरवाडा (१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर)” अंतर्गत महापारेषण ४०० के.व्ही. कोराडी उपकेंद्र विभाग- २ तर्फे मोरोपंत पिंगळे गौरक्षण, धंतोली येथे “गो-आहार दान कार्यक्रम” स्वयंउत्स्फूर्तपणे पार पडला.या वेळी कार्यकारी अभियंता लीलाधर लोहरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विभूष समर्थ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनोद पखाले व सहाय्यक अभियंता तुषार येसनसुरे उपस्थित होते. गाईंना हिरवा चारा, पेंढा, कडबा व फळांचा खुराक देण्यात आला महापारेषण कंपनीतर्फे “गाईला चारा चारणे व स्वच्छता करणे हीसुद्धा राष्ट्रसेवा आहे” हा संदेश देण्यात आला. याप्रसंगी महापारेषण कंपनीचे कार्याबद्दल माहिती देण्यात आली त्यावेळेस उपस्थितांनी त्याचे कौतुक केले.

Popular Articles