spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापारेषण कोराडी-२ तर्फे सेवा पंधरवाडा २०२५ मध्ये वृक्षारोपण उपक्रम

नागपूर :- सेवा पंधरवाडा २०२५ दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिन पासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत, सामाजिक बांधिलकी जपत व राष्ट्रीय सेवा व जनकल्याण या संकल्पनेला पुढे नेत महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी, ४०० केवी उपकेंद्र संवसु विभाग कोराडी- २ तर्फे वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा उपक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नांदा (पु.) जिल्हा परिषद नागपूर येथे राबविण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता लीलाधर लोहरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विभूष समर्थ व विनोद पखाले, सहाय्यक अभियंता प्रणव चौधरी, तंत्रज्ञ सत्यवान बर्डे, गायकवाड, चंद्रकुमार सोमकुंवर आदी उपस्थित होते. “एक पेड़ मां के नाम” या उपक्रमांतर्गत आंबा, आवळा, लिंबू, सीताफळ व पेरू यांसारख्या फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक बारई यांच्या समस्या ऐकून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले व महापारेषण कंपनीच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली.

Popular Articles