नागपूर :- विकास अर्बन क्रेडीट सहकारी संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रविवारी नामदेव सभागृह कुकडे ले आइट येथे संस्थेचे अध्यक्ष दिलीप सुरकार त्याचे अध्यक्षतेत पार पडली. या सभेत सुरकार यांनी संस्थेचा सन २०२४ ते २०२५ चा संपूर्ण लेखाजोगा व वाटचाल यावर प्रकाश टाकला. सर्व उपस्थित सभासदानी संस्थेचे अभिनंदन केले. संस्थेचे व्यवस्थापक तेजराम काळमेघ यांनी सभेचे संचलन केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष मोहन हाडगे यांनी मानले. यशस्वी करण्याकरिता संस्थेचे कर्मचारी सभा यशस्वी होण्यासाठी मनोज मोते, माधूरी बावनकुळे, राम टेभुर्णे मुकुल काळमेघ व मिना चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले.








