तिरोडा :- आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तातडीची बैठक आज स्थानिक जनसंपर्क कार्यालयात रविकांत बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत निवडणुकीसंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटन बळकटीकरण, उमेदवार निवड प्रक्रियेतील निकष, स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढविण्याची रणनीती आदी मुद्द्यांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले.
शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
शहरातील अनेकांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश
यासह बैठकीत पक्षाच्या पुरोगामी विचारांवर व युवा नेते रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात तिरोडा शहरातील अनेक महिला, युवा व पुरुषांनी जाहीर प्रवेश केला. प्रासंगिक पक्षाचा दुपट्टा घालून श्री रविकांत बोपचे यांनी पक्षात विधिवत प्रवेश देत स्वागत केले. पक्षात प्रवेश केल्याबद्दल प्रवेशितांचे पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.
या वेळी बोलताना प्रवेशितांनी सांगितले की, “पक्षाच्या पुरोगामी विचारधारेवर विश्वास ठेवून आणि समाजहितासाठी काम करण्याच्या हेतूने मी हा निर्णय घेतला आहे. पुढील काळात जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहून काम करणार आहे.”
यावेळी रविकांत बोपचे यांच्यासह, प्रदेश सरचिटणीस मेघा बिसेन, कार्याध्यक्ष नासिर घाणीवाला, कार्यवाह शहर अध्यक्ष आशिष येरपुडे, अनुसूचित जमाती सेल जिल्हाध्यक्ष संजय धुर्वे, जॉनी सैय्यद, सरपंच छाया टेकाम, सरपंच मंदा टेंभरे, सरपंच रंजित वालदे, विजय बुद्धे , मंगेश गेडाम, संजय टेंभरे, राजेश तांडेकर,रिता नारनवरे, महेश कुकडे, किशोर कुंभरे, नरेश जागंळे, निरज गजभिये, गुलाब कटरे, महेंद्र कडव, विकास बरियेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








