spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन

यवतमाळ :– हिंदू समाजातील पुरुषार्थ आणि शक्तीचे जागरण या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यवतमाळ नगरातर्फे श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्षी संघकार्याला प्रारंभ होऊन १०० वर्षे पूर्ण होत असल्याने हा सोहळा विशेष ठरणार आहे. उत्सवाचे आयोजन रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सायं. ६.१५ वाजता पोस्टल ग्राउंड येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती  आशीष पद्मचंदजी बाफना यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख वक्ते म्हणून मंगेश भंडे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख, रा. स्व. संघ हे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमासाठी नागरिकांना आपल्या कुटुंबासह वेळेपूर्वी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.तसेच पाच वाजता पथसंंचलन देखील निघणार आहे.

Popular Articles