spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लकडगंज झोन क्र. 08 मध्ये बकाया मालमत्ता कराचे वसुली करीता मौजा पारडी, मौजा नागपूर येथील 19 स्थावर मालमत्तेचा जाहिर लिलाव कार्यवाही

नागपूर :- नागपूर महानगरपालिका लकडगंज झोन क्र. 08 अंतर्गत स्थावर मालमत्ता बकाया कराचे वसुली करीता स्थावर मालमत्ता जाहिर लिलाव कार्यवाहीची धडक मोहिम दि. 03.10.2025 ला मौजा पारडी, मौजा नागपूर येथील एकुण 19 स्थावर मालमत्ता यावर बकाया मालमत्ता कर वसुल करण्यास्त्व कार्यवाही राबविण्यात आली. कार्यवाही अंतर्गत 5 मालमत्ता धारकांनी 10.45 लक्ष कराचा प्रत्यक्ष भरणा केला. 5 स्थावर मालमत्ता 166.00 लक्ष रकमेच्या विक्री करण्यात आलेल्या आहेत. 9 मालमत्ता उर्वरीत आहेत.

करीता उर्वरीत 9 संबंधित मालमत्ता धारकांना पुन्हा सुचित करण्यात येते की, मालमत्तेचा थकीत कराचा भरणा दि 10.10.2025 चे आत करावा अन्यथा सदर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या अनुसुची ‘ड’ प्रकरण 8 च्या नियम 45 पोटनियम (1) अन्वंये जाहीर लिलाव (नमुना अ) कार्यवाही लिलाव करुन बकाया कर वसुल करण्यात येईल तसेच झोन मधील इतरही मालमत्ता धारकांना आवाहान करण्यात येते की, त्यांनी बकाया मालमत्ता कर दि. 10.10.2025 चे आत भरुन लिलावाची कार्यवाही टाळावी.

सर्दहु कार्यवाही मा. उपायुक्त् (महसुल), मिलिंद मेश्राम यांच्या निर्दशानुसार झोनचे सहा. आयुक्त्‍  विजय थुल यांच्या मार्गदर्शनात अधिक्षक रोशन अहिरे, कर निरीक्षक भुषण मोटघरे, मनिष तायवाडे, लालअप्पा खान , सागर बालपांडे, सुर्यकांत रेवतकर, ठाकरे हयांचेद्वारे करण्यात आली.

Popular Articles