तिरोडा :- तालुक्यात आठ दिवसापासून तालुक्यात जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पाऊस येत असून त्यामुळे हलक्या धानाची नुकसान मोठ्या प्रमाणात झाली असून शेतकऱ्यांनी तलाठी कृषी सहाय्यक यांच्याकडे तक्रार केली असता आम्हाला शासनाचे आदेश नसल्याचे सांगून शेतकऱ्याची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहेत.इंदोरा बुद्रुक येथील शेतकरी हौशीलाल सोनेवाने यांचे तीन एकर शेतातील धान पाण्याने खराब झाले असून संपूर्ण धान पीक खाली पडले असुन मावा तुडतुडा रोग लागले आहे. असून तालुका कृषी विभाग दुर्लक्ष करीत आहेत तालुक्यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यांची पंचनामे सादरीने करण्यात यावे अशी मागणी पंचायत चे माजी उपसभापती व सदस्य हुपराज जमई वार यांनी केली आहे.








