spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; कामठीत आढावा बैठक

– बूथस्तरावरील नियोजनासह मतदार नोंदणी अभियानावर भर; नगराध्यक्ष अजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष आनंद राऊत यांची प्रमुख उपस्थिती

संदीप कांबळे, कामठी :- आगामी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कामठी विधानसभा क्षेत्रात संघटनात्मक तयारीला गती दिली आहे. याच अनुषंगाने जयस्तंभ चौकातील भाजप कार्यालयात निवडणूक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बूथस्तरावरील नियोजन, पदवीधर मतदार नोंदणी आणि संघटनात्मक समन्वय या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नगराध्यक्ष अजय अग्रवाल आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मतदार नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविणे, प्रत्येक स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे आणि बूथनिहाय नियोजन अधिक सक्षम करणे, यावर बैठकीत भर देण्यात आला.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षात घेता मतदार नोंदणीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पात्र पदवीधर मतदारांची नोंदणी, संघटनेच्या माध्यमातून जनसंपर्क आणि निवडणुकीसाठी आवश्यक पूर्वतयारी याबाबत पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. निवडणुकीतील पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

या बैठकीला माजी आमदार टेकचंद सावरकर, जिल्हा महामंत्री अनिल निधान व राहुल किरपान, मतदार नोंदणी प्रमुख मनोज चौरे, मौदा नगरपंचायत अध्यक्ष प्रशांत तिडके, भाजप कामठी शहराध्यक्ष मंगेश यादव, येरखेडा पंचायत अध्यक्ष राजकिरण बर्वे, भाजप कामठी ग्रामीण अध्यक्ष सचिन घोरमाडे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट, युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कोंडुलवार आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा नंदा बारई उपस्थित होते.

तसेच नगरसेविका लालसिंग यादव, दिव्या गायधने व मनीषा नागपुरे, नगरसेवक दिलीप बांडेबुचे व योगेश गायधने, माजी नगरसेवक कपिल गायधने, डॉ. संदीप कश्यप, नरेश कलशे, नरेश परवानी, प्रतीक पडोळे, विवेक मंगतानी, राजेश खंडेलवाल, कोराडी ग्रामीण अध्यक्ष ब्रह्मा काडे, राज हडौती, दिनेश बिल्लारवान आणि अनिल पिंगले यांच्यासह कामठी विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles