कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या केसरलॅन्ड टाऊनशीप समोरील साईबाबा कॉलनीसमोरील मेट्रो खांब क्रमांक 2P/211 जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गतरात्री 11 दरम्यान घडली असून अपघाती दुचाकीस्वार मृतक तरुणाचे नाव अजय शेखराव वाडीवे (वय ३०, रा. हमालपुरा, निंबाजी आखाड्याच्या मागे, कामठी असे आहे. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृतज अजय वाडीवे हे होंडा शाईन दुचाकीने (क्र. एमएच ४० सीएल २३०५) नागपूरहून कामठीच्या दिशेने प्रवास करीत होते. साईबाबा कॉलनीसमोरील मेट्रो खांबाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर त्यांना तातडीने कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाच्या पार्थिवावर आज शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसानी अज्ञात वाहनचालका विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








