– ७.०५ ग्रॅम एमडीसदृश अमली पदार्थासह ५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पारसीपुरा मैदानाजवळ पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून ७.०५ ग्रॅम एमडीसदृश अमली पदार्थासह स्विफ्ट कार, दुचाकी, सहा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ८७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई पहाटे पाच दरम्यान करण्यात आली व अटक पाचही आरोपी विरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या या पाचही आरोपी मध्ये शुभम सुरेश ढाकुळकर (वय ३०),रा दिघोरी, शिवम ऊर्फ दद्दू दिगंबर गजभिये (वय २८),रा वाठोडा, रोहन सुरेश ढाकुळकर (वय २९),रा दिघोरी, समीर अरुण काळे (वय २५) दत्तवाडी,आणि मोहीसिन खान सरदार खान (वय ३६) रा रामगढ कामठी चा समावेश आहे. ही यशस्वी कारवाई
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता साहू, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवीरकुमार बंडिवार आणि नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश नालटे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे, किशोर महंत आणि पोलीस अंमलदार विवेक दोरसेटवार, सूरज ठाकूर, तुषार , आशीष , आकाश, यांनी मोलाची भूमिका साकारली.







