spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाजपा आध्यात्मिक आघाडीद्वारे आषाढवारी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न!! 

नागपूर ०७ :  महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी एकादशी निमित्ताने आषाढ वारी दिंडी सोहळा भाजपा आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगर द्वारे गणेशपेठ येथील येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातून  भजनी मंडळ आणि वारकरी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहत संपन्न झाला. दिंडीचे पूजन आमदार प्रवीण दटके यांचे हस्ते करण्यात आले. भाजप अध्यक्ष दयाशंकर जी तिवारी यांच्या नेतृत्वात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलभक्त वारकरी आणि भजनी मंडळासोबत नामस्मरण दिंडी काढण्यात आली. यात पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ,ज्ञानबा माऊली तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय आदींचा जयघोषाने परिसर विठ्ठल नामात दुमदुमला. वारीच्या माध्यमातून भाविकवृंद एकत्र येऊन उत्साहाच्या वातावरणात ज्याप्रमाणे एकता, समानता, निर्मळता अशा अनेक मूल्यांचे प्रदर्शन करतात याचा प्रत्यय आला. परिसरातील रस्ता विठ्ठल भक्तांनी सडे शिपडून, फुलांनी, रांगोळ्यांनी सुशोभित होता. दिंडीत घोष, टाळ मृदंग, भगवे ध्वज, पर्यावरण संवर्धनाची फलके इत्यादीच्या माध्यमातून वारीचे दृश्य साकारले. पालखीचे षोडशोपचार पूजन पौरोहित्याखाली आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले. पूजेचा मान विश्वनाथ कुंभलकर या दामपत्याना देण्यात आला. त्यानंतर हरीपाठ पठण करण्यात आला. विठ्ठल रखुमाई यांच्या फोटोचे मंत्र  उपचाराने पूजन माल्यार्पण व महाआरती करून प्रसाद वितरण करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित दिंडीत सहभागी होते. कार्यक्रमाचा समारोप पसायदानांनी झाला .या दिंडींच्या यशस्वितेसाठी  आघाडी द्वारे अभिजीत कथले,मयूर वाजगे, विलास सपकाळ, स्वप्नील गायकवाड, माया हाडे, राहुल कुंभलकर, शंकर शर्मा, सुजात कठोते, दर्शना नखाते, विजय येरणे, समृद्धी वराडपांडे, आदिनी सहकार्य केले.

Popular Articles