spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जेष्ठ नागरीक समाजातील मुख्य घटक ; माजी मंत्री मुळक.

सचिन चौरसिया रामटेक ०७ : भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. जुलै महिन्यात जन्मदिवस व जेष्ठ नागरीक असणारे यांच्या सत्कार माजी मंत्री राजेंद्रजी मुळक यांचे हस्ते जेष्ट नागरीक विरंगुळा केंद्र, शहिद स्मारक रामटेक येथे ५ जुलै करण्यात आला. सत्कार करणाऱ्या मधे ८५ वर्षावरिल चंद्रभान बघेले, दत्तात्रय पंडे गोविंदराव मिरासे व जन्मदिवस असणारे संपतराव वंजारी, नरेंद्र काळे यांचा समावेश होता. या वेळी माजी राज्यमंत्री व कांग्रेस नेते राजेन्द्र मुळक म्हणाले की जेष्ठ नागरीक समाजातील मुख्य घटक आहे. त्यांच्यापासून जिवन जगण्याची कला शिकता येते. त्याच्यामध्ये प्रेमभावना संस्कार आहेत. जेष्ठ नागरीकांचे कार्यालय शहिद स्मारक येथे आहे ही समाधानाची बाब आहे. कारण जेष्ट नागरीकांनी स्वातंत्रपूर्व काळ अनुभव‌ला आहे. त्यामुळे शहिद स्मारकासी जेष्ट नागरीकांच्या भावनां जुळल्या आहेत. राजेंद्र मुळक यांनी जेष्ट नागरीकांना विविध योजनाचा लाभ घेण्याकरीता कंम्पुटर व प्रींटर देण्याची घोषणा केली. ते म्हणाले की वधू- वर परीचयाचे सामाजिक  काम जेष्ट नागरीकांनी करावे. यावेळी अध्यक्ष सुखराम उच्चीबगले , सचिव वामन नायगांवकर, उपाध्यक्ष हरीहर भुजाडे, सहसचिव रमाकांत कुंभलकर, तुलाराम मेंढे शहित  मोठ्या संखेत उपस्थित होते

Popular Articles