महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने नागपुरात मान्यवरांचा सत्कार सोहळा 12 ऑक्टोबरला

0
44

– तिरुपती येथील नियोजित भक्त निवासांच्या माहिती पुस्तकांचे विमोचन

नागपूर :- महासभेतर्फे सुधीर मुनगंटीवार (माजी मंत्री महाराष्ट्र ) तसेच  समीर कुणावर (तालिका अध्यक्ष महाराष्ट्र, विधानसभा.) यांचा सत्कार मा.विजयबाबू दर्डा ( माजी खासदार तथा चेअर मन लोकमत समूह) यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख उपस्तीथी मध्ये, डॉ. गिरीश गांधी (संस्थापक अध्यक्ष, वनराई फॉउंडेशन), महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासभेचे महासचिव गोविंद बिडवाई उपस्थित राहणार आहे. सोबतच नागपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टरांचा सत्कार, डॉ. श्रीकांत मुक्केवार, डॉ. सतीश पोशेट्टीवार, डॉ. शैलेंद्र गंजेवार, डॉ. समीर श्रीरंगवार, यांचाही सत्कार महासभेने आयोजित केलेला आहे. तसेच महासभा तीर्थक्षेत्र तिरुपती येथे भक्त निवास बांधित आहे, ज्यात 102 रूम्स उपलब्ध असतील. त्या प्रकल्पाच्या माहिती पुस्तकाचे विमोचन सुद्धा विजयबाबू दर्डा यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती दीपक नीलावार (अध्यक्ष महासभा नागपूर) यांनी दिली आहे.

कार्यक्रम दिनांक 12 ऑक्टोबर रविवार संध्याकाळी ६ वाजता. वनामती सभागृह, भोले पेट्रोलपंप जवळ, व्ही. आय.पी रोड नागपूर येथे होणार आहे.