spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रहारचे बेमुदत आमरण उपोषण 12पासुन सुरु

– प्रहार जनसक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने बसले बेमुदत आमरण उपोषणावर

गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बाजार चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष यांचे बेमुदत आमरण उपोषण 12 आक्टोबर पासून सुरू झाले आहे .

महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करुन उपोषणवर बसले आहे.

मुंडीकोटा परिसरातील मूलभूत मागण्या जलसिंचन योजना, पोलीस स्टेशन ,आरोग्य सुविधा, प्रवासा संबधित लोकल ट्रेन व बससेवा, शेतकरी सुविधाचा अशा 14 मागण्याला धरून बेमुदत आमरण उपोषणावर प्रहार जनसक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने हे मुंडीकोटा बाजार चौकात बसले असून या बेमुदत आमरण उपोसन स्थळी जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर पंचायत समिती सदस्य वनिता भांडारकर यांनी भेट दिली.

माझ्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून माझे प्राण गेले तरी बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे प्रहार अध्यक्ष यांनी सांगितले आहे. अन्नाचा कण सुध्दा तोंडात घेणार नाही मागण्या पूर्ण होत पर्यंत अशी आक्रमकता अध्यक्ष यांनी पुकारली आहे.

परिसरातील मागण्याला धरून प्रहार जनसक्ती पक्षाच्या आंदोलन सुरू असुन 4 ते 5 दिवसांत जर मागण्या पूर्ण न झाल्यास प्रहार जनसक्ती पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन करण्याचा येणार असल्याचा यावेळी इशारा महेंद्र भांडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी दिला आहे.

उपोस्थळी वामन हजारे सुरेन्द्र सुर्यवंशी, जागेश्वर भांडारकर,सुधीर गोमासे, विनय पारधी, सह प्रहार जनसक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles