किशोर साहू,मौदा :- पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेच्या वतीने गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन _“समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता”_, _“संविधान हाच आपला धर्म”_ अशा घोषणा देत गावकऱ्यांमध्ये संविधानाबाबत जनजागृती केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा भारती आंबिलढुके या होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष भगवान आंबिलढुके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे, केंद्रप्रमुख धानला राजू आंबिलकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले. संचालन शिक्षक राजेश रोहाड यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक सुधीर कांबळे यांनी केले.
प्रभात फेरीनंतर शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व सांगणारी भाषणे, गीते सादर केली. संविधानाने दिलेल्या हक्क व कर्तव्यांचे पालन करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे,राजेश रोहाड, सुजाता बोदेले, प्रज्ञा रामटेके, गीतांजली यादव,संगीता आंबिलढुके, ज्योती आंबिलढुके, पुष्पा उके, उमेश उके, रंजना उके यांनी परिश्रम घेतले.





