spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कौशल्य दिक्षांत समारंभात यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव

यवतमाळ :- बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै २०२५ मध्ये राष्ट्रीय, राज्यस्तर तसेच संस्थास्तरीय प्राविण्य प्राप्त व संपूर्ण उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा कौशल्य दिक्षांत समारंभ पार पडला.

या समारंभाचे प्रमुख आकर्षण ठरले देशपातळीवर विविध व्यवसायांमध्ये सर्वोच्च क्रमांक पटकावलेले प्रशिक्षणार्थी. विजतंत्री व्यवसायात महेश सुनिचल नेमाडे, यांनी प्रथम क्रमांक मिळवला. बेकरी अँड कन्झेक्शनर व्यवसायात अहद अब्दुल समद, तर कॉस्मेटोलॉजी व्यवसायात साक्षी रविंद्र काळपांडे व रुचिता गणेश दुमने यांनी राष्ट्रीय स्तरावरील यश संपादन केले.

मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात विशाल लक्ष्मण कदम व रोशनी प्रमोद बारस्कर, तसेच सेक्रेटेरियल प्रॅक्टिस व्यवसायात दुर्गेश रमेश नेहारे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्रातून वुड वर्क टेक्निशियन व्यवसायात अभिजीत ब्रिजकीशोर शर्मा यांनी प्रथम येण्याचा मान मिळवला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विकास मीना जिल्हाधिकारी, उपस्थित होते. यावेळी नितीनकुमार श्रीवास्तव (वर्क्स डायरेक्टर, रेमंड युको डेनिम प्रा. लि.), जाफर गिलानी (एम.डी., सारा स्मिन्टेक्स प्रा. लि.), राजेश गढीकर (रोटरी क्लब ऑफ यवतमाळ) आणि गजानन राजूरकर (जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मीना यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “निळणाऱ्या संधीचं सोने करण्याची तयारी असावी. कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक आहे.

संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे योगदान फार महत्वाचे आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेशकुमार कोडापे, यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पिंगळे यांनी केले, तर तांत्रिक सहाय्य श नितीन खडसे व त्यांच्या चमूने पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले, असे प्राचार्य विनोद नागोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

Popular Articles