– स्वस्त धान्य दुकानातुन गहू मिळेना!
कामठी :- ऐन दिवाळीच्या तोंडावर गरीब आणि गरजू कुटुंबांना ज्वारीच्या भाकरीवर दिवाळीचा सण साजरा करण्याची वेळ आली आहे.शासनाकडून दरवर्षी दिवाळीसाठी देण्यात येणारा आनंदाचा शिधा यावर्षी गायब झाला आहे विशेष म्हणजे नेहमी मिळणाऱ्या गव्हाचा पुरवठाही न झाल्याने स्वस्त धान्य दुकानातून गहु मिळत नसल्याने गरीब लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी दिवाळीच्या उत्सवाच्या पाश्वरभूमीवर राज्य सरकार कडून आनंदाचा शिधा दिला जात होता यामध्ये डाळ,रवा, पोहे,मैदा आणि साखर दिल्या जात होती यामुळे गरीब कुटुंबांना गोडधोड पदार्थ बनवून दिवाळी साजरी होत होते मात्र यंदा पुरवठा विभागाकडून आनंदाचा शिधा देणे बंद झाले आहे विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकानातून गव्हाचा सुद्धा दुष्काळ पडला आहे गेल्या वर्षी निवडणूक असताना निवडणुकीच्या तोंडावर शिधावाटप केला होता परंतु यावर्षी गरीब जनतेला यापासून दूर ठेवण्यात आले आहे यामुळे यंदाची दिवाळी ज्वारीच्या भाकरीवर साजरी करावी लागणार आहे.



