कामठी :- जिल्हा दक्षता समिती कामठीची आढावा बैठक शुक्रवारला कामठी तहसील कार्यालय येथे पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान दक्षता समितीचे अध्यक्ष राजेश रंगारी यांनी भूषविले.
बैठकीस तहसीलदार जगदाळे, पुरवठा अधिकारी निशिकांत बदमोरे तसेच विविध नगरपरिषद व नगरपंचायतींचे दक्षता समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. यावेळी मनीष कारेमोरे, राज हाडोती, अंकित तुरक, अक्षय काळे, मीनाक्षी वासनिक, राहुल बोढारे, सेवक उईके, विनोद पाटील, राजकिरण बर्वे, प्रतीक पडोले आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी अध्यक्ष राजेश रंगारी यांनी अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (PHH) अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना वेळेवर अन्नपुरवठा होणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले. तसेच ज्यांची KYC प्रक्रिया प्रलंबित आहे, ती तातडीने पूर्ण करून सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.



