ज्येष्ठ नागरिक कक्षातर्फे शनिवारी वृक्षारोपण

0
57

-‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमात सक्रीय सहभाग

नागपूर :- नागपूर महानगरपालिका ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत शनिवार १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता ओंकारनगर चौक, मानेवाडा येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण केल्या जाणार असून, कार्य्कामाच्या अध्यक्षपदी सिनीअर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिकचे मनोहरराव खर्चे राहणार आहेत. अशी माहिती मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे समन्वयक सुरेश रेवतकर यांनी दिली.

शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहत वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपाच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.