spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी गुरूवारी (ता. १६) शहरातील दुर्गानगर येथील हिंदी व मराठी प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या काही प्रश्न विचारून शैक्षणिक प्रगतीबद्दल चाचपणी केली.

यावेळी मनपाचे सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे, शाळा निरीक्षक विजय सोनी आणि शाळेचे शिक्षक  कृष्णा उजणे यांच्यासह इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. वैष्णवी बी. यांनी माध्यमिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु असताना भेट दिली. त्यानंतर दुर्गा नगरच्या बालवाडीला भेट दिली. त्यांनी बालकांना काही प्रश्न विचारले, काही इंग्रजीतील नावे सुद्धा विचारले, त्यानंतर रंगाची नावे, वस्तू आणि फळाचे नावे याबबत माहिती विचारली. विद्यार्थ्यांनी ही बरोबर उत्तरे दिली. विद्यार्थ्यांची उत्तम प्रगती पाहुन अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी समाधान व्यक्त केले.

या भेटीदरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृतीयुक्त गाणी आणि गोष्टींच्या सादरीकरणाचे विशेषत्वाने अवलोकन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सादर केलेल्या या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमांचे कौतुक करत असतानाच, त्यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय बाबींसंदर्भात शिक्षकांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. तसेच या भेटी दरम्यान त्यांनी होंडाची पाठशाळा या उपक्रमाची माहिती सुद्धा त्यांनी घेतली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.