– पर्यावरणपूरक वाहनाना मिळणार चालना
नागपूर :- नागपूर शहरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपातर्फे तयार करण्यात येत असलेल्या अकरापैकी तीन ठिकाणी नागरिकांसाठी ईव्ही चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. शहरात इलेक्ट्रिक वाहनांचा चार्जिग सुविधा मिळल्याने पर्यावरण पूरक वाहन चालविणे आता शक्य होणार आहे. यामुळे शहरातील 2 व्हिलर, 3 व्हिलर व 4 व्हिलर ईव्ही गाडी चालविणाऱ्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्दशनानुसार, शहरात सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून 11 विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना आपल्या गाड्या या ठिकाणी चार्जिग करता येणार आहे. अलिकडे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्या रहाटे चौक येथे या इलेक्ट्रिक वाहन चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाचे भुमीपूजन हस्ते झाले होते. या नव्या ईव्ही चार्जिग स्टेशनमुळे शहरातील ईव्ही गाडी चालवणाऱ्या नागरिकांना आता जलद गतीने गाडी चार्जिग करता येणार आहे.
ई-वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळावा आणि वाहनामुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, याकरिता महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे. 11 ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामे रिलायन्स बी.पी. इन्फ्रा लिमिटेड, मुंबई यांच्याकडून करण्यात येत आहे. ही माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड यांनी दिली,
सध्या राहाटे कॉलनी चौक (PKV च्या जागेजवळ), पत्रकार भवन जवळील पार्किंगच्या जागे मध्ये यशवंत स्टेडियम जवळ आणि वाडी नाका अमरावती रोड या तीन ठिकाणी ईव्ही चार्जिग स्टेशनचे कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित आठ ठिकाणी लवकरच ईव्ही चार्जिग स्टेशनचे कामे होणार आहे.
इतर ठिकाणी ईव्ही चार्जिग स्टेशनची कामे सुरु असणारे ठिकाणे
जयताळा बाजार चौक (ऑरज स्ट्रीट), राहाटे कॉलनी चौक (PKV च्या जागेजवळ), दयानंद पार्क, पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट सेक्शन काटोल रोड, फुटाळा रोड पोलीस चौकी जवळ, बुधावारी बाजार सक्करदरा पाण्याच्या टाकीजवळ, शांती नगर मेन रोड पाण्याच्या टाकीजवळ, अंजूमन कॉलेजच्या मागे मंगळवारी कॉम्प्लेक्स, सेंट्रल बाजार रोड वर तुली एम्पीरियर हॉटेलच्या पार्किंगच्या विरुध्द बाजूला या ठिकाणी ईव्ही चार्जिग स्टेशन उभारण्यात येत आहेत.








