spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी घेतला रमाई आवास योजनेचा आढावा

भंडारा :- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी भंडारा जिल्हा परिषदेतील सभागृहात रमाई आवास योजनेचा आढावा घेतला. या बैठकीला सहाय्यक आयुक्त आशा कवाडे, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या घटकांचे सर्वांगीण विकासासाठी मिळणाऱ्या निधीमधून उत्तम दर्जाची घर होणे अपेक्षीत आहे. तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ पोहोचण्यात प्रशासकीय अडचणी येऊ नये,कामात सुधारणा व्हावी व निधीचा योग्य वापर व्हावा या दृष्टीने सर्व यंत्रणांनी काम करावे असे निर्देश मेश्राम यांनी यावेळी दिले.

साकोली येथे 2011 मेसर्स स्टुडिओ इलेव्हन प्रोप्रायटर या कंपनीने जिल्हा परिषदेच्या कामातर्गतस व्यापारी संकुलासाठी बृहद आराखडा करताना जिल्हा परिषद यंत्रणेने राबविलेल्या प्रक्रीयेवर मेश्राम यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या विविध विभागांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला, यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पंधरा दिवसात तपशीलवार माहिती घेऊन आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले .

रमाई आवास योजनेत सातही तालुक्यातील कामाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. त्यामध्ये 2018- 19 या आर्थिक वर्षापासून अनेक घरांचे काम अपूर्ण आहे प्रशासकीय अनास्थेमुळे पहिला हप्ता देऊनही अनेक घरांचे बांधकाम 2025 -26 पर्यंत पूर्ण झाले नाही. याबाबतीत मेश्राम यांनी नाराजी व्यक्त केली तसेच याबाबतीत त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना स्वयं स्पष्ट अभिप्रायसह व माहितीसह मुंबई येथील आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होण्याचे निर्देश दिले.

साकोली तालुक्यातील दलित वस्ती व नवोदयांच्या विकासाकरता विशेष घटक योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षात 62 ग्रामपंचायतींना तीन कोटीच्या वर विकास कामे झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी कामामध्ये लोकसंख्येच्या तुलनेमध्ये एससी- एसटीच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये निधीचे प्रमाण असावे आणि दिलेल्या निधीचे निधीचे वितरण व कामाची गुणवत्ता राखण्याची सूचना मेश्राम यांनी केली.

यानंतर जिल्हा क्रीडा संकुलाल त्यांनी भेट दिली, यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी त्यांना विविध योजनांची माहिती दिली.

Popular Articles